Pune : मालकालाच धमकावून खंडणी मागणाऱ्या कामगारांना अटक

एमपीसी न्यूज – मालकाची दिनचर्या , व्यवहार पाहून कामगारांनीच (Pune) त्याच्या गुन्हेगार साथीदारांसह मालकाला धमकी दिली व 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन कामगार व त्यांचा साथीदार असे चार जणांना अटक केली आहे.

सौरभ संजय बनसोडे (वय 21 रा. रामनगर, वारजे), पवन मधुकर कांबळे (वय 22, रा. धायरी), संकेत योगेश जाधव (वय 24, रा. नऱ्हे) आणि कृष्णा भीमराव भाबट (वय 19, रा. धायरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

2000 Rupee Note Ban : अन अखेर दोन हाजारांची नोटही गेली….नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज महामार्गावरील आर्यन स्कूलजवळ पाच-सहा जणांनी सहा मे रोजी कंपनीच्या मालकाची मोटार अडवून शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच, 12 मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना मोबाईलवर व्हॉटसअप कॉल करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागितली.

खंडणी न दिल्यास फिर्यादी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई (Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.