Pune News : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ चित्रपटासाठी पुणेकर उत्सुक

एमपीसी न्यूज – ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ हा दुसऱ्या महायुद्धावर आधारित चित्रपट येत्या शुक्रवारी (दि २१) जगभर प्रदर्शित होत आहे. इंग्रजी चित्रपट असूनही पुण्यातील तमाम सिनेफाईल या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. तिकिटांचे दर हे बाकीच्या चित्रपटांपेक्षा जास्त असूनही पुण्याची विविध चित्रपट गृहे आधीपासूनच हाउसफुल झालेली आहेत.

 Pune : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

चित्रपटाचे दिग्दर्शक नोलन यांनी चित्रपट आयमॅक्सच्या चित्रपटगृहांमध्ये बघण्याचे आवाहन सर्व प्रेक्षकांना केले आहे. असे अजब आवाहन त्यांनी का केले आहे ह्याचे उत्तर चित्रपट पहिल्या नंतर कळेल. औंधच्या वेस्ट एन्ड मॉलमधील आयमॅक्सचा तिकीट दर हजार रुपयांपेक्षा जास्त असूनही चित्रपट पहिले तीन दिवस हाउसफुल झाला आहे. बाकीचे प्रसिद्ध थिएटर जसे की सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉलचे थिएटर, पीव्हीआर थिएटर हे देखील हाउसफुल झाले आहेत.

 

Christopher Nolan, Emma Thomas at arrivals for Warner Bros. Pictures Invites You to The Big Picture at CinemaCon 2017, The Colosseum at Caesars Palace, Las Vegas, NV March 29, 2017. Photo By: JA

 

ख्रिस्तोफर नोलन यांनी इन्सेपशन, इंटरस्टेलार, प्रेस्टिज, टेनेट, मेमेंटो यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या चित्रपटांचे जगभर चाहते आहेत. नोलन यांचा चित्रपट ४ वर्षांनी येत असून त्यामध्ये किलियन मर्फी, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, एमिली ब्लण्ट, मॅट डेमन, फ्लोरेन्स पघ, गॅरी ओल्डमॅन, रॅमी मलिक यांच्यासारखा अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रसिद्ध स्टार कास्ट आहे ज्यामुळे या चित्रपटाची ‘क्रेझ’ ही जगभर बघायला मिळत आहे.

‘ओपनहायमर’ हा चित्रपट ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्युलियस ओपनहायमर हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि दुसऱ्या महायुद्धात लॉस अलामोस प्रयोगशाळेचे संचालक पण होते. मॅनहॅटन प्रकल्प, संशोधन आणि विकास उपक्रम ज्याने प्रथम अण्वस्त्रे तयार केली त्यामध्ये त्यांच्या भूमिकेसाठी त्यांची “अणुबॉम्बचे जनक” अशी ओळख आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.