ICC News : भारत वेस्ट इंडिज दुसरी कसोटी; किशन आत, ऋतुराज बाहेर

एमपीसी न्यूज – उद्यापासून सुरु होणाऱ्या (ICC News) भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या कसोटी सामन्याबाबत कर्णधार रोहित शर्माने भारतीय क्रिकेट संघाबाबत महत्वाची माहिती बुधवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्याने येणाऱ्या सामन्यात संघामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता नसल्याचे म्हंटल्याने क्रिकेट चाहत्यांनी असा निष्कर्ष बांधला आहे, की ऋतुराजला या मालिकेत संधी मिळणे कठीण आहे.

माध्यमांशी बोलताना रोहित म्हणाला, ” डॉमिनिकामध्ये जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहिली आणि परिस्थिती जाणून घेतली तेव्हा आम्हाला संघाबाबत स्पष्ट कल्पना आली. पावसाची चर्चा असल्याने येत्या सामन्यात काही स्पष्टता नाही, पण संघाच्या 11 मध्ये फार मोठे बदल होतील असे मला वाटत नाही. मात्र, परिस्थिती प्रमाणे छोटे बदल संघामध्ये करावे लागतीलच.”

कर्णधाराने कोणाचेही नाव घेतले नसले तरी, डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट ह्याला बदलतील असे वाटत आहे.  कारण का तो मागच्या सामन्यामध्ये मोहम्मद सिराज किंवा शार्दुल ठाकूर यांच्यासारखा प्रभावी दिसत नव्हता व त्यामुळे नव्या कुणालातरी संधी मिळू शकते.

Pune News : ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ चित्रपटासाठी पुणेकर उत्सुक

वेस्ट इंडिजला अवघड जाईल, या अपेक्षेमध्ये अक्षर पटेल (ICC News) हा तिसरा फिरकी गोलंदाज असू शकतो किंवा परिस्थिती ढगाळ राहिल्यास मुकेश कुमारच्या स्विंग गोलंदाजीचा वापरही करण्यात येऊ शकतो.

पुढे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आज असो वा उद्या संघामध्ये संक्रमण व्हायलाच हवे, पण मला आनंद आहे की आमच्यात येणारे भावी खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आम्ही सिनियर खेळाडू असल्याने आमची भूमिका महत्त्वाची आहे कारण त्यांना (युवा खेळाडूंना) स्वतःची भूमिका स्पष्ट करायची आहे. येत्या वर्षांमध्ये संघ त्यांच्यावरच अवलंबून असणार आहे.”

रोहित शर्मा वेस्ट इंडिज बाउन्स बॅक करू शकतात याला प्रकाश देत म्हणाला, ” भारतीय संघाला या खेळात घेऊन जाणे ही सन्मानाची बाब आहे आणि असे दररोज होत नाही. दोन्ही संघानी इतिहासामध्ये एकमेकांविरोधात खूप चांगले क्रिकेट खेळले आहे. मला खात्री आहे की ते (वेस्ट इंडिज ) बाउन्स करतील आणि दोन्ही संघांसाठी ते रोमांचक असेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.