Cricket News : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा डिसेंबरमध्ये; पहा वेळापत्रक

एमपीसी न्यूज – येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचा (Cricket News) दक्षिण आफ्रिका दौरा आयोजित करण्यात आला असून या दौ-यामध्ये भारत आणि आफ्रिका संघात तीन ट्वेंटी ट्वेंटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.

पहिला ट्वेंटी ट्वेंटी सामना 10 डिसेंबर रोजी डरबन येथे रंगणार आहे. 12 डिसेंबर रोजी क्चेखा येथे दुसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना होईल तर तिसरा ट्वेंटी ट्वेंटी सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे.

Pimpri : वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन दिवसात 26 लाखाहून अधिक दंड वसूल

पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे 17 डिसेंबर 2023 (Cricket News) रोजी होईल, दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी क्चेखा येथे तर तिसरा एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पर्ल येथे खेळला जाणार आहे.

त्यानंतर 26 ते 30 डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना सेन्चुरीयन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाउन येथे रंगणार आहे. सर्व सामने स्टार स्पोर्ट वाहिन्यांवर पाहता येणार आहे.

या  दौ-यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्यापही झालेली नाही. विश्वचषक 2023 स्पर्धा संपल्यानंतर हा संघ घोषित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.