Today’s Horoscope 11 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 11 November 2023 
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – 11.11.2023
शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य.
आज विशेष – शिवरात्री.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – चित्रा.
चंद्र राशी – कन्या 13.02 पर्यंत नंतर तुळ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात काही मतभेद संभवतात. जोडीदाराची बाजू समजून घेणे हिताचे राहील.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
दुकानदारांची उधारी वसूल होईल आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल वैवाहिक जीवनात आज जुन्या फोटोंचा अल्बम चाळणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग- जांभळा)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. नवोदित कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागतील.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)
वास्तु व वाहन खरेदीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासा व्यतिरिक्त सर्व काही करतील.

सिंह -( शुभ रंग – क्रीम)
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली काही नाती जवळ येतील.

कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दाला मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात खोळंबा संभवतो.

तूळ ( शुभ रंग- लाल)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला हवी.

वृश्चिक ( शुभरंग – स्ट्रॉबेरी) Today’s Horoscope 11 November 2023 
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम राहील. गृहिणी दिवाळीनिमित्त महागड्या वस्तूंची आज मनसोक्त खरेदी करतील. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी चालून येतील.

धनु (शुभ रंग- मोरपंखी)
आज तुमच्यासाठी उत्साह पूर्ण दिवस असून प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने आज कार्यक्षेत्रात यश दृष्टीक्षेपात येऊ शकेल.

मकर (शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. व्यवसायात जाहिरातीसाठी नवीन माध्यमे वापरावी लागतील. जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल.

कुंभ – (शुभ रंग- सोनेरी)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेले आहेत. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी आहेच अशा भ्रमात मुळीच राहू नका. संध्याकाळी सज्जनांचे पाय घराला लागतील.

मीन ( शुभ रंग- भगवा)
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. आज जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.