Pimpri : वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन दिवसात 26 लाखाहून अधिक दंड वसूल

एमपीसी न्यूज – महापालिका कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण नियंत्रण (Pimpri) मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वायू प्रदूषण नियंत्रण पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आतापर्यंत एकूण 12 लाख 92 हजार 250 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर आज 13 लाख 62 हजार असा दोन दिवसात 26 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

शहरातील वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील असून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणेही तितकेच महत्वाचे आहे. वायू प्रदूषण नियंत्रण पथकांच्या वतीने शहरातील विविध जागांची पाहणी करण्यात येत असून वायू प्रदूषण रोखणेकामी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

तरी शहरातील नागरिकांनीही वायू प्रदूषण नियंत्रण पथके पाहणीसाठी आल्यास त्यांना सहकार्य करावे आणि शहरातील वायू प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले होते.

पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या (Pimpri) वतीने 32 प्रभागांमध्ये एकूण 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकांच्या वतीने आतापर्यंत एकूण अनेक ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्यातील ब-याच ठिकाणी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायदा 1986, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 1981 नुसार नोटीस बजावण्यात आली होती.

Morwadi : मोरवाडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करा – राजेश अग्रवाल

प्रदूषण नियंत्रण पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन फोटो किंवा व्हिडिओग्राफीद्वारे त्याची नोंद घेण्यात येत आहे. यादरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात असून नोटिस जारी करून कामाची जागा सील केली जात आहे.

नोटीस बजावलेल्यांची संख्या, वसूल केलेला दंड आणि दररोज होणाऱ्या कारवाईची या पथकांद्वारे नोंद ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.