Morwadi : मोरवाडीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करा – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Morwadi) मोरवाडीत सेवा रस्त्याच्या कडेला सराफी, कपड्याचे दुकान झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होती. वाहनचालकांना तीन-तीन सिग्नलला थांबावे लागते. त्यामुळे अहिल्यादेवी चौका पर्यंतच्या इमारतींची फ्रंट मर्जिनची जागा महापालिकेने विकत घेऊन या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

मुंबई – पुणे सेवा रस्त्यावर पिंपरी येथील एक हॉटेल ते अहिल्यादेवी चौक ( फिनॉलेक्स चौक) दरम्यान रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे चौकात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची खूप मोठी रांग लागते.

Dapodi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

या चौका जवळ विविध मोठी दुकाने आहेत. तिथे नेहमी गर्दी असते. मुळातच मेट्रोच्या खांबामुळे या ठिकाणी रस्ता खूपच अरुंद आहे. त्यात बीआरटीएसची लेन असल्यामुळे रस्ता अजून अरुंद झाला आहे. याच ठिकाणी स्पीड रोड ते सेवा रस्त्यासाठी मर्ज आऊट आहे. त्यामुळे स्पीड रोड वरून बाहेर पडणारी वाहतूक अजून गर्दीत भर पडते.

स्पीड रोड ते सेवा रस्ता ज्या ठिकाणी मर्ज आऊट होतो, त्या ठिकणापासून ते फिनोलेक्स चौकापर्यंत बीआरटीएसचे बॅरीकेट (Morwadi) काढून टाकावे. त्या दरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी खुला करावा. मर्ज इन व मर्ज आऊट बदल करावेत. डी-मार्ट नंतर ज्या ठिकाणी मर्ज इन आहे. तिथे मर्ज आऊट करावे. तनिष्क जवळ जिथे मर्ज आऊट आहे तिथे मर्ज इन करावे, असे अग्रवाल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.