Pune : देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेऊन वीज कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा – महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

एमपीसी न्यूज – महापारेषण भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली (Pune) असून महापारेषण व महावितरणच्या सरळ सेवा भरतीपूर्वी वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून योग्य व सकारात्मक निर्णय घ्यावा या करीता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोजी पुण्यात निवेदन दिले.

महापारेषण व महावितरणच्या भरतीमध्ये कंत्राटी कामगारांना प्रति वर्ष दोन गुणा प्रमाणे पाच वर्षा करिता कमाल दहा गुण अतिरिक्त देण्याची मान्यता देण्यात आली, असे परीपत्रक महावितरण व महापारेषण कंपनीने काढले आहे.

मात्र या निर्णयांच्या विरोधात संघटना असून त्यात अनेक त्रुटी आहेत. या निर्णयाचा फायदा मागील 15 ते 20 वर्षे काम करत असलेल्या कुशल अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना होणार नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Pimpri : रसायनयुक्त पाणी महापालिकेच्या जलनि:सारण नलिकेत सोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा

मुळात हा निर्णय एकतर्फी झाला असून वीज कंपनी प्रशासनाने (Pune) ऊर्जामंत्री यांची दिशाभूल केली असल्याचा संशय आहे, असे संघटनेचे मत आहे.

त्यामुळे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघटने सोबत बैठक आयोजित करून या बाबत चर्चेअंती निर्णय घ्यावा, तो पर्यंत भरती प्रक्रिया करू नये अन्यथा संघटनेला नाईलाजास्तव मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असे मत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.