Pimpri : रसायनयुक्त पाणी महापालिकेच्या जलनि:सारण नलिकेत सोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रसायनयुक्त पाणी महापालिकेच्या जलनि:सारण (Pimpri) नलिकेत सोडणाऱ्या ताथवडे येथील 24 क्लेन (मेसर्स क्लेनफॅब सर्विसेस एल. एल. पी) या ड्रायक्लिनर्सच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केजूदेवी बंधारा थेरगाव येथे मागील काही दिवसांपासून पवना नदीमध्ये पांढऱ्या रंगाचा फेस तयार होवून दुर्गंधी येत आहे. या अनुषंगाने पर्यावरण व जलनि:सारण विभागाच्या वतीने ताथवडे भागात सर्वेक्षण केले.

Maharashtra : सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर

या दरम्यान ताथवडे येथील 24 क्लेन (मेसर्स क्लेनफॅब सर्विसेस एल. एल. पी) या ड्रायक्लिनर्सच्या कंपनीने ड्रायक्लिन करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता महापालिकेच्या जलनि:सारण नलिकेस विना परवाना जोडले होते. हे सायनयुक्त पाणी हे काळपट निळसर व फेसयुक्त होते.

ड्रायक्लिन कंपनीच्या मालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pimpri) करण्यात आला आहे.

ही कारवाई जलनि:सारण व पर्यावरण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य निरिक्षक अमोल गोरखे, गोरक्षनाथ करपे, कनिष्ठ अभियंता संदिप पाडवी, सचिन मगर यांच्या वतीने करण्यात आली.यापुढेही अशी कारवाई चालू राहणार असून अशा प्रकारच्या नदी प्रदूषण करणा-या व्यक्ती आढळून आल्यास त्यांचे विरूद्ध कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी देखील असे आढळून आल्यास महापालिकेस त्वरित कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.