Ravet : रायझिंग मेन लिकेज, आज सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपींग स्टेशन येथील (Ravet)टप्पा क्रमांक 3 व 4 च्या रायझिंग मेनला लिकेज झाल्यामुळे या लाईनवर अवलंबून असलेल्या भागातील आज (बुधवारी) सायंकाळाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, उद्या गुरुवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.

रायझिंग मेनला लिकेज झाल्यामुळे 3, 4 च्या लाईनवरील (Ravet) चिंचवडचा काही भाग, नेहरुनगर, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, सांगवी, वाकड, निगडी प्राधिकरण, ताथवडे, किवळे, मामुर्डी, चिखली, मोशीचा काही भाग, जाधववाडी, रुपीनगर, तळवडे, कृष्णानगर, यमुनानगर, आकुर्डी या भागातील पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आज बुधवारी रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील.

Pimpri : बालाजी लॉ कॉलेज मध्ये अभिरूप न्यायालयचे आयोजन

तर, उद्या गुरुवारचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. लिकेज काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.