Pune : पुणे पुस्तक महोत्सवात ‘किशोर’चे स्मरणरंजन

किशोर मासिकाच्या गाजलेल्या 50 मुखपृष्ठांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – बालभारतीचे किशोर मासिक हे राज्यभरात लोकप्रिय (Pune)आहे. शालेय जीवनात किशोर मासिकाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या किशोर मासिक वाचूनच मोठ्या झाल्या आहेत. गेल्या पाच दशकांचा समृद्ध वारसा असलेल्या किशोर मासिकच्या गेल्या पन्नास वर्षांतील मुखपृष्ठांचे प्रदर्शन पुणे पुस्तक महोत्सवात भरवण्यात आले आहेत. महोत्सवाला भेट देणारे पुणेकर हे प्रदर्शन पाहून स्मरणरंजनात दंग होत आहेत.

Ravet : रायझिंग मेन लिकेज, आज सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (Pune)मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने या महोत्सवात आहेत.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला, महोत्सवातील कार्यक्रमांना पुणेकरांकडून अलोट प्रतिसाद लाभत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच किशोरच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन भरवण्यात आले असल्याने पुणेकरांना येता-जाता हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळत आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बालपणीच्या किशोर आठवणींमध्ये रमत आहेत, तर पालक त्यांच्या मुलांना किशोरचे प्रदर्शन दाखवून त्यांच्या वाचनाच्या आठवणी सांगताना दिसत आहेत.

किशोर मासिकाच्या मुखपृष्ठाच्या प्रदर्शनाविषयी किशोरचे संपादक किरण केंद्रे म्हणाले, की किशोर मासिकाचे सध्या 52वे वर्ष सुरू आहे. या मासिकासाठी आजवर अनेक मान्यवर चित्रकारांनी योगदान दिले आहे. पुणे पुस्तक महोत्सवात किशोरच्या गाजलेल्या 50 मुखपृष्ठांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.