Chinchwad : चोरीला गेलेला 2 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे नागरिकांना वापस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या 125 (Chinchwad) गुन्ह्यात जप्त केलेला तब्बल 2 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज (दि.20) पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला.

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, व पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1 विवेक पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2 काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-3 संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल कोळी, सहायक पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात गुन्ह्यांतील एकुण 484 ग्रॅम वजनाचे 21 लाख 37 हजार 140 रुपयांचे सोन्याचे दागिने , तसेच 2 चारचाकी वाहने, 8 लाख 70 हजार रुपयांच्या 22 मोटारसायकल , 14 लाख 88 हजार, 890 रुपयांचे 69 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, विविध कंपन्यांमधुन चोरीस गेलेला 1 कोटी 23 लाख 18 हजार 681 मुद्देमाल, तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधुन जप्त केलेली रोख रक्कम (Chinchwad) 48 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज असा एकूण 2 कोटी 42 लाख 59 हजार 361 रुपयांचा ऐवज मुळ मालकांना परत करण्यात आला .

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे कार्यकाळात दुस-यांदा हा कार्यक्रम पार पडला. यापुर्वी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधुन पोलीस आयुक्त यांचे शुभहस्ते वेगवेगळ्या 84 गुन्ह्यांतील सुमारे 1 कोटी 46 लाख 93 हजार 705 रुपये किंमतीचा मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला होता.

या कार्यक्रमाची प्रस्तावना वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी केली. पोलीस आयुक्त यांनी या प्रसंगी फिर्यादींना उद्देशून तुमच्या चेह-यावरचा आनंद पाहुन पोलीस अधिकारी म्हणुन आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली.

Ravet : रायझिंग मेन लिकेज, आज सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

तसेच यापुढे देखील असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील जेणे करुन जनतेचे मनोबल वाढेल व अधिकाधिक फिर्यादी पुढे होवनु पोलीसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील असे मनोगत व्यक्त केले.

तसेच ज्या पोलीस अधिका-यांनी या गुन्ह्यांचा तपास करुन मुद्देमाल हस्तगत केला त्यांचे अभिनंदन देखील केले. तसेच संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांनी पोलीस अधिका-यांचे अभिनंदन ब मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्यांना आपला मुद्देमाल परत मिळाला अशा काही फिर्यादींनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.