Oppenheimer – ओपनहायमरच्या ‘त्या’ सीनसाठी अनुराग ठाकूर आणि भारतीय प्रेक्षकांचा विरोध

एमपीसी न्यूज – भारतामध्ये प्रदर्शित झाल्यापासून, ओपनहायमार चित्रपटाची उत्सुकता आता तीव्र विरोधात (Oppenheimer ) बदलण्याची परिस्तिथी दिसून येत आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित चित्रपटाच्या काही दृश्यांना भारतीय प्रेक्षकांचा व हिंदू धर्माच्या प्रतिनिधींचा विरोध बघायला मिळत आहे. भारतीय सिनेफाईल हे ओपनहायमरच्या भगवत गीतेचा वापर हा एका अश्लील सीनमध्ये केल्याचे कृत्य अमेरिकन चित्रपट निर्मात्यांनी केले आहे.

Pune : सुशिक्षित मध्यमवर्गीय नागरिकांची भूमिका ही निर्ढावलेपणाची व निर्बुद्धपणाची – कुमार केतकर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या वादग्रस्त दृश्यावर कठोर भूमिका घेतली आहे. ठाकूर यांनी वादग्रस्त दृश्याच्या उत्तरात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) कडून संपूर्ण जबाबदारीची मागणी केली आहे.

अनुराग ठाकूर यांनी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटातील वादग्रस्त दृश्य तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी देणाऱ्या सर्व सीबीएफसी सदस्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यापूर्वी, केंद्र सरकारचे माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनीही या दृश्यावर आपली नाराजी व्यक्त केली होते व चित्रपट निर्मात्यांना फटकारले होते. त्यांनी दिग्दर्शक नोलनला चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्य हटवण्याचे आवाहन करून, ते पुढे म्हणाले, “नोलनने चित्रपटातून हे दृश्य काढून टाकावे. यातून धार्मिक द्वेषाची भावना येत आहे. जर त्याने हे दृश्य काढून टाकले नाही तर आम्ही कठोर भूमिका घेऊ,” असे ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आम्हाला एका वैज्ञानिकाच्या जीवनावर आधारित चित्रपटावर या अनावश्यक दृश्यामागील कारण माहित नाही. पण हा एक करोडो हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हल्ला आहे.”

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात बनवलेला हा बायोपिक रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्यावर आधारित  आहे, ज्यांना ‘फादर ऑफ द ऍटोमिक बॉम्ब’ म्हणून ओळखले जाते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिलियन मर्फी, एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी (Oppenheimer ) ज्युनियर, फ्लोरेन्स पग, रॅमी मलिक आणि जॅक क्वेड यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.