Pune : पुणे आकाशवाणीचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती

एमपीसी न्यूज : पुणे आकाशवाणीचे केंद्र (Pune) छत्रपती संभाजीनगरला हलविण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर अनेकांनी त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री विद्यमान राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या निर्णयास आता स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रकाश जावडेकर यांची शिष्टाई कामाला आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FChDadaPatil%2Fstatus%2F1669324278167396352&widget=Tweet

पुणे आकाशवाणी केंद्र छत्रपती संभाजीनगरला हलवण्याच्या निर्णय चार दिवसापूर्वी घेण्यात आल्यानंतर त्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पुण्यामध्येच हे युनिट असावे,अशी मागणी देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

 

Wakad : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 22 दुचाकी जप्त

त्या सर्व घडामोडी दरम्यान खासदार प्रकाश जावडेकर यांनी प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या (Pune) बातम्यांचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. याबाबतची चर्चा केली. त्याच दरम्यान प्रकाश जावडेकर हे तेलंगणाच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी अनुराग ठाकूर यांच्याशी प्रकाश जावडेकर यांनी फोनवर चर्चा केली आणि पुणे आकाशवाणीचे केंद्र छत्रपती संभाजीनगरला हलवण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.