Wakad : वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; 22 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या (Wakad) दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 15 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड, पिंपरी, हिंजवडी, सांगवी, रावेत आणि दौंड पोलीस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ओंकार दिलीप गवारे (वय 23, रा. पिंपळे सौदागर), महेश महादेव दनाने (वय 21, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी होणाऱ्या ठिकाणांवर पेट्रोलिंग करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तसेच दिवसा व रात्री अचानक नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली. तपासादरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, चोरीची दुचाकी विकण्यासाठी दोन चोरटे ताथवडे परिसरात येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपींचा माग काढला. पोलीसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 22 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी चोरी केलेल्या दुचाकी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात विकल्या होत्या.

गुन्हयाच्या तपासात आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी चोरलेल्या दुचाकी (Wakad) त्यांच्या नातेवाईकांना विकल्याचे निष्पन्न झाल्याने चोरीची वाहने विकत घेणाऱ्या तिघांना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात सह आरोपी केले आहे.

Maharashtra School : शाळेची घंटा वाजली; ‘एक टर्म एक बॅग’साठी सरकारी शाळा सज्ज

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गिरे, संदीप गवारी, दिपक साबळे, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, संतोष बर्गे, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय फल्ले, तात्या शिंदे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे, विनायक घारगे, रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.