Maharashtra School : शाळेची घंटा वाजली; ‘एक टर्म एक बॅग’साठी सरकारी शाळा सज्ज

एमपीसी न्यूज – आजपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 2023-24 या शैक्षणिक (Maharashtra School) वर्षाला सुरुवात झाली. सरकारने आणलेल्या पहिली ते आठवीसाठीच्या ‘एका टर्मसाठी एक बॅग’ या विचारानंतर महाराष्ट्रातील शाळा सुरु होण्यासाठी गेले 2 आठवडे उत्सुक होत्या. भलेही राज्यातील विविध ठिकाणी शाळा सुरु झाल्या असल्याचे दिसून येत असले तरी विदर्भातील शाळा या 30 जूनपासून सुरु होणार आहेत.

यावर्षीपासून पाठ्यपुस्तके 4 भागात विभागली गेली असून, प्रत्येक सेमिस्टरला सगळ्या विषयांसाठी एकच पुस्तक असणार आहे. सरकारी शाळांमध्ये तर प्रत्येक धड्यानंतर रिक्त पृष्ठ देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे पाठयपुस्तक व वही याचे काम एकत्रच होणार आहे. ही योजना सध्या सरकारी शाळांसाठी मर्यादित असून सरकारी शाळांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर खासगी शाळांत देखील राबवण्यात येणार आहे.

या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पालकांना सूचनाअ देताना म्हंटले, की पालकांनी आपला पाल्य  शाळेत एकच पुस्तक घेऊन जातात का नाही? पाल्याचे दप्तराचे ओझे कमी आहे का नाही? हे तपासावे. तर शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तकांची रिक्त पृष्ठ कशी वापरायची? याबाबत तयारीचे एक ऑनलाईन सत्र सुद्धा आयोजित करण्यात आले होते.

या सोबतच सरकारी शाळांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके व गणवेशाचे वाटप करावे. अशा सूचनाअ देण्यात (Maharashtra School) आल्या अहते. राज्य सरकारने काढलेल्या ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजनेचे पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Pune : पाणी कपातीच्या निषेधार्थ पुणे महापालिकेवर मनसेचा हंडा मोर्चा

सुहृद मंडळ संचलित चिंचवड बधिर मूक विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देऊन व सेल्फी पॉईंट तयार करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे बँडच्या गजरात शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका उमा तारू यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका पल्लवी पिंपळे, शाळेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश टिळेकर व कलाशिक्षक देशमुख जिवन, कदम मुकुंदा, शेख आयेशा यांनी पाहिले.

शिशुवर्ग ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्प देण्यात आले. स्वागतासाठी मोठी रांगोळी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटपही करण्यात आला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ, गाणे, नृत्य असे आयोजन केले होते. तसेच बौद्धिक खेळही घेण्यात आले. मुलांचा उत्साह अवर्णनीय होता. प्राथमिकचे मुख्याध्यापक गौतम इंगळे, माध्यमिकचे मुख्याध्यापिका वैशाली नरवडे आणि संचालिका डॉक्टर तेजस लिमये यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.