Pune : पाणी कपातीच्या निषेधार्थ पुणे महापालिकेवर मनसेचा हंडा मोर्चा

एमपीसी न्यूज : पुणे महापालिका प्रशासनाने (Pune) पाणी कपातीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. तर यावेळी प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी साईनाथ बाबर म्हणाले की, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणात मुबलक पाणी साठा आहे. तरी देखील महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला. त्यात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असून दुसर्‍या दिवशी कमी दाबाने पाणी येते. तसेच अनेक ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

Pune Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, 3 वर्षाच्या मुलासमोर वडिलांचा मृत्यू

तसेच ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती. त्यावेळी शहरातील अनेक भागात पाण्याच्या टाक्या बांधल्या जातील अशी घोषणा केली होती. त्यातील काही टाक्याची काम झाली आहेत. तर काही टाक्या धूळखात पडून आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही आज महापालिका प्रशासना विरोधात हंडा मोर्चा काढत निषेध नोंदवित आहे.

या आंदोलनाची दखल महापालिका आयुक्त तथा प्रशासक (Pune) विक्रम कुमार यांनी घ्यावी अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.