Pune : मदनदास देवी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले अंत्यदर्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Pune) अंत्यदर्शन घेतले.

Oppenheimer – ओपनहायमरच्या ‘त्या’ सीनसाठी अनुराग ठाकूर आणि भारतीय प्रेक्षकांचा विरोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच वयाच्या 81 व्या वर्षी काल बंगळरु येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान

त्यांचे पार्थिव पुण्यातील मोदी बाग येथे ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोदी बाग येथे मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह अनेक नेते मंडळी उपस्थित (Pune) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.