Mumbai : चकाला परिसरात सोसायटीवर दरड कोसळली

दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – मध्यरात्री  मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना (Mumbai) घडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळली. रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराचा ढिगारा गेला. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pune : मदनदास देवी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले अंत्यदर्शन

अंधेरी चकाला रामबाग सोसायटी 23 वर्षे जुनी आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बॉम्ब ब्लास्ट सारखा आवाज आला. इमारतीच्या बाजूला असलेल्या डोंगराचा एक भाग कोसळून इमारतीवर कोसळला. त्यामुळे इमारतीच्या भिंती तोडून दगड घरामध्ये शिरले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाच घरांमध्ये माती शिरली आहे. सध्या या घटनेमुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटना स्थळावर दाखल झाले होते. या दरड दुर्घटनेमध्ये पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान (Mumbai) झाले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.