India vs WI : पावसाने केला भारतीय संघाच्या विजयाचा खेळखंडोबा

भारतीय संघाने विंडीजविरुद्ध जिंकली सलग 9 वी मालिका

एमपीसीन्यूज:(विवेक कुलकर्णी) दोन कसोटी सामन्याच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना जो भारत आणि वेस्ट इंडीज या दोन (India vs WI) देशातील ऐतिहासिक असा 100 वा कसोटी सामना होता. त्यात काल सामन्याच्या अंतिम  दिवशी पावसाने आपली अवकृपा दाखवल्याने निकाल येवू शकला नाही आणि हा सामना अनिर्णित अवस्थेत समाप्त झाला.

Mumbai : चकाला परिसरात सोसायटीवर दरड कोसळली

जागतिक कसोटी विश्वकप स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस पावसाने हाणून पाडला. भारतीय संघ जिंकूनही त्यांना तसा विशेष काहीच फायदा झाला नाही, तर वेस्ट इंडीज संघाच्या गुणांचे खाते पावसामूळे उघडले आहे.

भारतीय संघाच्या पुढील मालिका तुलनेत कठीण असल्याने विंडीज विरुध्द निर्भेळ यश मिळवून भारतीय संघ गुणतालिकेत आघाडीवर राहिल असा अंदाज या मालिकेआधी वर्तवला जात होता. मात्र पावसाच्या विंडीज संघावरच्या मेहरबानीमुळे आता भारतीय संघाचा प्रवास काहीसा बिकट होईल अशी भीती आता उत्पन्न झाली आहे.

Pune : मदनदास देवी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले अंत्यदर्शन

आजच्या शेवटच्या दिवशी पावसाने एकदाही विश्रांती न घेतल्याने पंचांनी उपहारानंतर ते चहापानापर्यँत वाट बघितली पण पाऊस थांबत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सामना अनिर्णित झाला हे घोषित केले गेले. यामुळे भारतीय संघाला विंडीजविरुद्ध निर्भेळ यश मिळवण्यात अपयश आले असले तरीही भारतीय संघांने विंडीजविरुध्द सलग नववी मालिका जिंकून आपले मागील काही वर्षांपासून असलेले वर्चस्व अबाधित ठेवले.

मोहम्मद सिराजला त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम गोलंदाजी सामन्याचा मानकरी म्हणून घोषित केले गेले. तर मालिकेत 15 गडी बाद (India vs WI) करणारा आणि उपयुक्त फलंदाजी करणाऱ्या अश्विनला मालिकेचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.


भारतीय संघासाठी नवोदित ईशान किशन, यशस्वी जैस्वाल ,मुकेशकुमार यांच्यासह अनुभवी रोहित ,कोहली, अश्विन जडेजाची कामगिरी या यशात अधिक प्रभावी ठरली. त्याचवेळी अजिंक्य रहाणेचे अपयश जास्त खुपणारे ठरले. नवोदित फलंदाज संघातील प्रवेशासाठी दार ठोठावत असताना रहाणेने चांगली संधी गमावली असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय संघ विंडीजमधे आता तीन एकदिवसीय सामने खेळणार असून त्यातला पहिला सामना येत्या 27 तारखेला खेळवला जाईल तर 29 ला दुसरा व 1 तारखेला अंतिम सामना खेळवण्यात येईल. यानंतर टी-20 (India vs WI) मालिकाही रंगणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.