Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता एच ट्रॅव्हिस ठरल्या मिसेस अचिव्हर 2023

एमपीसी न्यूज – जयपूर येथे रविवारी (दि.23) आयोजित मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन या कार्यक्रमात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या ( Pune) मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस यांची मिसेस अचिव्हर 2023 म्हणून निवड झाली आहे.

Oppenheimer – ओपनहायमरच्या ‘त्या’ सीनसाठी अनुराग ठाकूर आणि भारतीय प्रेक्षकांचा विरोध

सविता ट्रॅव्हिस या मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल इंटेलेक्चुअल 2022, ग्लॅमर गुडगाव मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल 2022 च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक असून सध्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे, त्या प्रार्थना ग्रुप लीडर एसएफएक्स, चिंचवड येथे अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. तसेच, सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स, पुणे सीबीएसई 2022 च्या सीबीएसई डिस्ट्रिक्ट कॉनऑर्डिनेटर 3 च्या समन्वयक म्हणून काम पाहत होते.

India vs WI : पावसाने केला भारतीय संघाच्या विजयाचा खेळखंडोबा

जयपूर येथे आयोजित मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन या कार्यक्रमात त्यांना मिसेस अचिव्हर 2023  या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. ग्लॅमर गुडगाव मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनलच्या बरखा नांगिया आणि अभिषेक नांगिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्यांच्या निवडीचे कमला शिक्षण संकुलाचे अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार भूपाली शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन ( Pune) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.