Talegaon Dabhade : पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार – गणेश भेगडे

एमपीसी न्यूज – राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण (Talegaon Dabhade) शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली.

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी व तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची सदिच्छा भेट घेऊन राज्यातील पोल्ट्री उद्योजकांच्या मागण्याचे निवेदन दिले.

Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता एच ट्रॅव्हिस ठरल्या मिसेस अचिव्हर 2023

यावेळी कार्याध्यक्ष सुभाष केदारी सचिव प्रविण शिंदे,सचिन आवटे, संभाजी शिंदे,बाबाजी पाठारे, संभाजी केदारी, एकनाथ पोटफोडे आदी (Talegaon Dabhade) पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोल्ट्री  व्यावसायिकांच्या अडीअडचणी  तसेच विविध प्रश्नांवर  मनमोकळेपणाने चर्चा केली. यात पोल्ट्री शेडचा ग्रामपंचायत टॅक्स कमी  करावा,विज बिल कमी व्हावे, भारत सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी  राज्याकरिता बनवलेली मार्गदर्शक तत्वे स्वीकारावी आदी प्रश्नांवर  सविस्तर चर्चा केली.

राज्य शासनाच्या महसूल कृषी व पशुसंवर्धन तसेच उर्जा खाते याचे मंत्री  व वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क  करुन मार्ग काढू, अशी ग्वाही श्री  भेगडे यांनी यावेळी दिली.

राज्य  संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले.तर अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी आभार (Talegaon Dabhade) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.