Pune : मदनदास देवी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच वयाच्या 81 व्या वर्षी काल बंगळरु येथे निधन (Pune)  झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहीनीमध्ये 11.50 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शाह,सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेते मंडळी यांनी उपस्थित राहून मदनदास देवी यांना श्रद्धांजली वाहिली.

Talegaon Dabhade : पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार – गणेश भेगडे

मदनदास देवी यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील मोतीबाग येथे सकाळी अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह,सरसंघचालक मोहन भागवत,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते मंडळीनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर मोतीबाग येथून मदनदास देवी यांची अंत्ययात्रा 11 वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत आल्यानंतर 11.50 वाजता विद्युत दाहीनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात (Pune)  आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.