Talegaon Dabhade : चिकाउचो कंपनी व रोटरीने केला शिळींब प्राथमिक शाळेचा कायापालट

 एमपीसी न्यूज -चिकाउचो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब पिंपरी पुणे यांनी सीएसआरच्या (Talegaon Dabhade) माध्यमातून मदत करून मावळ तालुक्यातील शिळींब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट केला. हॅपी स्कूल व हॅपी अंगणवाडी या उपक्रमांतर्गत शाळेत विविध कामे करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी नवीन सायकलचे देखील वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिळींब येथील शिक्षक वृंद व पोलीस पाटील संदीप बिडकर व शिळींब गावातील मान्यवर
सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिळींब तालुका मावळला चिकाउचो इंडिया प्रा. लिमिटेड व रोटरी क्लब पिंपरी पुणे कडून सीएसआरच्या माध्यमातून मदत करून सामाजिक जाणिवेची जपणूक झाली (दि. 15)रोजी चिकाउचो इंडिया प्रा ली. तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब पिंपरी पुणे यांच्याकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून जि.प.प्राथमिक शाळा शिळींब येथे “हॅपी स्कूल व हॅपी अंगणवाडी” उपक्रमा अंतर्गत शाळेतील फरशी बदलणे,शाळेसाठी नवीन छत बनवणे,शाळेतील भिंतींची रंगरंगोटी करणे, मुलांना शालेय साहित्य वाटप करून शाळेचे पूर्ण चित्रच बदलले.

याबरोबरच मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नवीन आर. ओ. (RO) वॉटर कुलर व स्वच्छतागृह दुरुस्ती करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्याच्या त्रासातून मुक्तता (Talegaon Dabhade) मिळवण्यासाठी नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. या सर्व सोयीसुविधा मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद वाहत होता.

Talegaon Dabhade : महावीर जयंती निमित्त रविवारचा आठवडे बाजार स्थलांतरित

या सर्व उपक्रमाच्या हस्तांतरणाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये मोलाचे सहकार्य देण्यामध्ये चिकाउचो इंडिया कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी गणेश कदम,मुख्य कार्यकारी अधिकारी मिकेल मेंडीब व कंपनीचे अधिकारी वर्ग सचिन पाटील, महेश पाटील,विनय सिंगवी,पंकज मिश्रा, यतेंद्र पाठक,नागनाथ भराडे,सौ स्मिता बसुदे, अमृता पठारे, ऋतिक चव्हाण आणि अशोक माने प्रेसिडेंट रोटरी क्लब पिंपरी यांचे (Talegaon Dabhade) मोलाचे सहकार्य लाभले.

 

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिळींब येथील शिक्षक वृंद व पोलीस पाटील संदीप बिडकर व शिळींब गावातील मान्यवर सरपंच आणि ग्रामस्थ यांनी चिकाउचो इंडिया कंपनीचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.