Talegaon Dabhade : महावीर जयंती निमित्त रविवारचा आठवडे बाजार स्थलांतरित

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजार दर रविवारी मारुती मंदिर ( Talegaon Dabhade) चौकात भरतो. महावीर जयंती निमित्त येत्या रविवारी (दि. 21) होणारा आठवडे बाजार थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळा मैदान तसेच भोसले चहा ते मोहर प्रतिमा या ठिकाणी भरणार आहे. याबाबत मुख्याधिकारी एन के पाटील यांनी माहिती दिली आहे.

Today’s Horoscope 20 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

रविवार (दि 21) रोजी वर्धमान महावीर जयंती असून त्यानिमित्त जैन समाजाकडून मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक शोभायात्रा याचे आयोजन करण्यात आले आहे .या धार्मिक कार्यक्रमासाठी 21 तारखेचा आठवडे बाजार नेहमीच्या ठिकाणी होणार नसून त्या मध्ये वरील प्रमाणे बदल करण्यात आले आहे; याची नोंद सर्व नागरिक व्यावसायिक विक्रेते व्यापारी यांनी घ्यावी असे आव्हान नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून करण्यात आले ( Talegaon Dabhade) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.