Alandi : दुर्मिळ व सामान्य तस्कर सापाला जीवदान

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) दि.20 रोजी  हवेली भागात संतोष सोनवणे यांच्या निवासस्थानी  पहाडी तस्कर दुर्मिळ बिनविषारी साप आढळला. त्यांनी सर्पमित्र आनंद वडगांवकर यांना संपर्क साधला. आनंद वडगांवकर यांनी त्यांच्या कौशल्याद्वारे त्यास पकडले. 

Maharashtra News : वारकऱ्यांना शासनातर्फे मिळणार विमा संरक्षण

मोठ्या झाल्यानंतर या सापाचा रंग बदलतो.या सापाची अल्प संख्या आहे. शहरी भागात हा साप क्वचित आढळतो. याबाबतची माहिती आनंद यांनी दिली.

 

तसेच केळगाव रस्त्या जवळील नागणे यांच्या निवासस्थानी सामान्य जातीचा काळसर रंगाचा तस्कर बिनविषारी सापआढळून आला.या सापाला पुरुषोत्तम वाघमारे या सर्पमित्राने पकडले. दोन्ही सापास चाकण घाटात सोडले जाणार आहे. याबाबत माहिती आनंद वडगांवकर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.