RBI News : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणं हा चलन व्यवस्थापनचा भाग – गव्हर्नर शक्तिकांत दास

एमपीसी न्यूज – दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणे हा चलन व्यवस्थापनचा (RBI News) भाग असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते.

गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, नोटबंदीनंतरच्या काळात चलनाची गरज तातडीनं भागवण्यासाठी प्रामुख्यानं दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. मात्र, चलनाची गरज तातडीने भागवण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. चलनात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात असल्यामुळे आता दोन हजाराच्या नोटा कमी करण्यात येत आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व बँकांना दिल्या आहेत.

Pune : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव

नोटा बदलण्यासाठी दिलेल्या 30 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत दोन हजार रुपयांच्या बहुतांश नोटा सरकारी तिजोरीत जमा होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 30 सप्टेंबरपर्यंत परत येणाऱ्या नोटांच्या संख्येवरून या नोटेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक दीर्घ काळापासून स्वच्छ चलन धोरणाचं पालन करत असून त्यानुसार यापूर्वी वेळोवेळी विशिष्ट क्रमांकाच्या नोटा चलनातून काढून घेऊन नव्या नोटा जारी केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

रोजचा तपशील बनविण्याचे बँकांना निर्देश

बदलण्यासाठी जमा झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची तपशीलवार माहिती दररोज सादर करावी असे निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत. नोटांशी निगडित माहिती आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करुन मागणीनुसार द्यावा असेही निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले (RBI News) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.