RBI : आता युपीआय द्वारे जमा होणार एटीएम मधून बँक खात्यात पैसे

एमपीसी न्यूज – एटीएम मध्ये पैसे जमा करण्यासाठी आता डेबिट कार्डची (RBI)गरज भासणार नाही. कार्डलेस सुविधे प्रमाणेच आता युपीआय द्वारे एटीएम मधून खात्यात पैसे जमा करता येणार आहेत. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली.

एटीएम मध्ये डेबिट कार्ड द्वारे खात्यात पैसे जमा करता येतात. काही बँकांनी कार्डलेस (RBI) सुविधा सुरु केली आहे. त्यामध्ये बँक खात्याचा तपशील माहिती असेल तर कार्डलेस सुविधा वापरता येत असे. आता आरबीआयने त्यापुढे जाऊन युपीआय द्वारे पैसे जमा करता येतील, अशी घोषणा केली आहे.

ही सुविधा कधीपासून सुरु होईल, याबाबत अद्याप सांगण्यात आलेले नाही. एटीएम स्क्रीनवर एक क्युआर कोड येईल, तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला बँक तपशील द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एटीएम मधून बँक खात्यात पैसे जमा करता येतील.

LokSabha Elections 2024 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा 100 टक्के मतदानाचा निर्धार

युपीआय द्वारे पैसे काढण्याचा अनुभव लक्षात घेता आता कॅश डिपॉझिट मशीन (सीडीएम)ला देखील युपीआयची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

खात्यात युपीआय द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा सुरु झाल्यास बँकांमधील पैसे जमा करण्यासाठीची रांग आणखी कमी होईल. बँकांच्या कामकाजावरील ताण देखील यामुळे कमी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.