Fastag News : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या फास्टॅग यादीतून पेटीएम वगळले; या बँकांमधून काढता येणार फास्टॅग

एमपीसी न्यूज – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग (Fastag News)जारी करणाऱ्या बँकांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पेटीएम बँकेचा समावेश नाही. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर NHAI ने नवीन सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे.

नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत आरबीआयने पेटीएम पेमेंटस बँकेला 15 मार्च नंतर सर्व बँकिंग सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, फास्टॅग आणि इतर वॉलेटला पेटीएम पेमेंटस बँक खाते जोडले असेल तर त्यात व्यवहार करण्यावर बंधने आणली गेली आहेत.

15 मार्च नंतर पेटीएम पेमेंटस बँक खाते जोडल्या गेलेल्या (Fastag News)फास्टॅग वॉलेटमध्ये नवीन रिचार्ज करता येणार नाही. त्यातील शिल्लक असलेले पैसे संपेपर्यंत ते वॉलेट वापरता येणार आहे. त्यानंतर मात्र नवीन फास्टॅग काढावा लागेल, असे NHAI ने सांगितले आहे.

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता द्या म्हणून धमकावणाऱ्या तथाकथीत भाईला अटक

फास्टॅग ऑनलाईन, ऑफलाईन काढता येणार

NHAI कडून ठिकठिकाणी फास्टॅगचे वितरक नेमले आहेत. त्यांच्याकडून नवीन फास्टॅग काढता येईल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क द्यावे लागेल. तसेच ऑनलाईन माध्यमातून देखील नवीन फास्टॅग मागवता येणार आहे. तिथे देखील वाहनासंबंधी आणि इतर आवश्यक माहिती व शुल्क द्यावे लागील.

या बँकांमधून फास्टॅग खरेदी करता येणार

एअरटेल पेमेंटस बँक, अलाहाबाद बँक, इंडसइंड बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, एक्सिस बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, सीटी युनियन बँक, कॉसमॉस बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, एस बँक, युनियन बँक, ऑफ इंडिया, युको बँक, त्रिशूर जिल्हा सहकारी बँक, जळगाव पीपल्स कॉ ऑप बँक, सिंडीकेट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, दक्षिण भारतीय बँक, सारस्वत बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब महाराष्ट्र बँक, नागपूर नागरिक सहकारी बँक, लिव्हक्विक टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्र बँक, करुर वैश्य बँक, कर्नाटक बँक, इंडियन ओवरसीज बँक, इंडिअन बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक.

पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीनचे काय होणार

पेटीएमचे क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन देशभरातील व्यापाऱ्यांकडे सर्रास आहेत. पेटीएमवर कारवाई केल्यामुळे यांचे काय होणार, हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, आरबीआयच्या कारवाई नंतर पेटीएम पेमेंटस बँकेची मुख्य कंपनी असलेल्या One97 Communications ने आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेत हस्तांतरित केले आहे. त्यामुळे 15 मार्च नंतर देखील पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.