Maval : मावळ राष्ट्रवादी राबवणार एकल भगिनी सक्षमीकरण अभियान

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी महिला काँग्रेस मावळ यांच्या ( Maval) संकल्पनेतून ‘एकल भगिनी (विधवा) सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मावळातील प्रत्येक गावामधील एका विधवा महिलेस स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 21 ते 50 वयोगटातील विधवा महिला यासाठी लाभार्थी म्हणून पात्र असतील.

प्रत्येक गावनिहाय विधवा महिलांची माहिती घेऊन स्थानिक पदाधिकारी व राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे एका महिलेचे नाव काढण्यात येईल व या चिठ्ठीद्वारे नाव आलेल्या महिलेस शिलाई मशीन देण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्षा दिपाली गराडे यांनी दिली.

Dehu Road : चुकून घराच्या पत्र्यावर लागलेल्या दगडामुळे तरुणाला बेदम मारहाण

पतीचे अकाली निधन झाल्यानंतर बहुतांश महिलांच्या वाटेला हालअपेष्टाच येतात.यामध्ये काही महिलांच्या घरची स्थिती चांगली असेल तर त्यांना आर्थिक अडचणी जास्त जाणवत नाहीत.मात्र सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्या महिलेवर आभाळ कोसळते. घराचा व मुलांचा सांभाळ करणे देखील कठीण होऊन जाते.विधवांच्या या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणीतरी शाश्वत आधार दिला की त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होतो व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वास देखील मिळतो.विधवा महिलांसाठी राष्ट्रवादीने चांगला उपक्रम हाती घेतला असुन या अभियानाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दिपाली गराडे म्हणाल्या, “विधवा महिलांच्या प्रश्नाबाबत केवळ सहानुभूती न ठेवता त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.या महिलांना आधार मिळावा,स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्न सुरु व्हावे यासाठी राष्ट्रवादीचा हा उपक्रम आशादायक ( Maval)  ठरेल.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.