LokSabha Elections 2024 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा 100 टक्के मतदानाचा निर्धार

एमपीसी न्यूज – “आम्ही सर्वजण, लोकशाही प्रती जागृत करण्याच्या दृष्टीने, आपल्या (LokSabha Elections 2024)देशाच्या प्रती प्रतिज्ञा करतो की आम्ही मुक्त, निष्पक्षपणे व शांततेने आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता, आम्ही निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेत आहोत ” अशी आशयाची शपथ निगडी,सेक्टर 26 येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली तसेच शंभर टक्के मतदानाचा निर्धारही केला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची (LokSabha Elections 2024)टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास आणि कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी.प्रा. दिनेश कुटे,नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

Loksabha Election 2024 : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात द्यावयाच्या 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ

तर कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.काळे यांनी दरवर्षी सरासरी 4 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगून 13 मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी कॉलेजमध्येही आजी-माजी विद्यार्थांमार्फत सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून उपस्थित प्रध्यापक,सेवक वर्ग आणि विद्यार्थ्यांना 100 टक्के मतदान करावे असे आवाहन केले यावेळी विद्याथ्यानीही 100 टक्के मतदान करण्याचा तसेच मित्र परिवार व इतर ठिकाणी सोशल मिडीयाद्वारे मतदानाचा प्रचार करण्याबाबत तयारी दर्शविली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.