RBI News : 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI News) दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडे आतापर्यंत जमा झालेल्या नोटांचा आढावा घेतल्यानंतर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी निवेदन जारी करून 2 हजाराच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांत जमा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यामुळं आता वाढलेल्या 7 दिवसांच्या मुदतीत ज्यांच्याकडे 2 हजाराच्या नोटा असतील त्यांनी आपल्या नजीकच्या बँकांमध्ये किंवा रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक केंद्रांत जमा करावे, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकेत जमा झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आहे. या कालावधीत नोटा बँकांमध्ये जमा करता येतील.

त्यानंतर 8 ऑक्टोबरपासून अहमदाबाद , बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम या प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2 हजारांच्या नोटा जमा करता येतील.

Pune : महमद पैगंबर जयंती निमित्त उद्या पुण्यामध्ये वाहतूक मार्गात बदल

तसेच भारतीय पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांकडे या नोटा जमा करता येतील. या नोटांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा (RBI News) केली जाईल. यासाठी संबंधित व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या ओळखपत्रांचे पुरावे द्यावे लागतील.

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 19 मे 2023 रोजी भारतातील चलनात 2 हजार रुपयांच्या3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या, त्यापैकी 29 सप्टेंबर पर्यंत 3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. आता फक्त 0.14लाख कोटी रुपयांच्या नोटा जमा व्हायच्या आहेत. या आकडेवारी नुसार 19 मे ते 29 सप्टेंबर या कालावधीत रिझर्व्ह बँकेकडे दोन हजार रुपयांच्या 96 टक्के नोटा जमा झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.