Reserve Bank of India: रविवारी 31 मार्चला बँक सुरु राहणार ;रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज – 31 मार्चला रविवारआहे. तरी देखील या दिवशी बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून हि माहीती दिली. यात  रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार असून, वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर (Reserve Bank of India)काम आहे. त्यामुळं 31 मार्चला बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार असला तरी नियमित वेळेनुसारच बँका उघडतील. 31 मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. पण , यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.असं ही सांगितलं आहे.

 

Hinjawadi : विद्यार्थीनीसोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा दाखल 

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी रविवारी बँका सुरु राहणारआहे. आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्यामुळं बँका सुरु राहणार आहेत. RBI ने  दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चला भारत सरकारशी संबधीत असणाऱ्याच सर्व बँका सुरु राहणार आहेत.

या दिवशी सर्व बँका खुल्या असल्यामुळं वर्षातील आर्थिक व्यवहार सगळे पूर्ण होतील असं RBI ने म्हटलं आहे. देशात 1 एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच होळीचा सण आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं या आठवड्यात बँका कामकाज पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळं रविवारी बँका सुरु राहणार आहे.

31 मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. 1 एप्रिलच्या दिवशी सोमवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील RBI ने घेतला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.