Earthquake:मराठवाड्यातील नांदेड ,परभणी, हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के

एमपीसी न्यूज -मराठवाड्यातील नांदेड ,परभणी, हिंगोलीमध्ये भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहे. नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे.

आज सकाळी नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण (Earthquake)घाबरुन घराबाहेर आले होते. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के आज जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत.

 

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर आहे. भूकंपाची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना जाणवली आहे. अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.