Pune: विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावर उद्यापासून वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील(Pune) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्या (शुक्रवार) पासून बदल करण्यात येणार आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी ही माहिती दिली.

गणेशखिंड रस्त्यावर उड्डाणपूल आणि मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे(Pune) या रस्त्यावर वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक शाखेकडून करण्यात येणारा बदल असा राहील.

 

आचार्य आनंदऋषीजी चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोर यू टर्न घेऊन सेनापती बापट रस्ता जंक्शनवरून डावीकडे वळण घेऊन जावे.

शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्यावर येणाऱ्या आणि रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांना रेंज हिल्स कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु टर्न घेऊन रेंज हिल्स कॉर्नर येथून डावीकडे वळण घेऊन रेंजहिल्स कडे जावे.

पुणे विद्यापीठासमोरील चौकातून औंध, सांगवी आणि डांगे चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना औंध रस्त्यावरून प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : विद्यापीठासमोरील चौकातून बाणेर रस्त्याने जावे आणि राजभवनाच्या पाठीमागील बाजूस यू टर्न घेऊन विद्यापीठासमोरील चौकातून डावीकडे वळण घेऊन औंध रस्त्याने जावे.आचार्य आनंदऋषीजी चौकातून बाणेर कडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बाणेर रस्त्यावरून प्रवेश बंद राहील.

र्यायी मार्ग : पुणे विद्यापीठासमोरील चौकातून डावीकडे वळण घेऊन पाषाण रस्त्याने अभिमानश्री जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन बाणेरकडे जावे. बाणेर आणि औंध रस्त्यावरून पुणे विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत कोणताही बदल केलेला नाही.
तसेच ट्रक, ट्रेलर्स आणि कंटेनर्स यांना या मार्गांवर 24 तास प्रवेश बंद राहील.

– गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते आचार्य आनंदऋषीजी (पुणे विद्यापीठ) चौक.

– औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक

– अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक

– जेडब्ल्यू मेरिएट हॉटेल चौक ते पुणे विद्यापीठ चौक.

भाजीपाला वाहतूक करणाऱ्या तीन चाकी पिकअप आणि मालाची वाहतूक करणाऱ्या मिक्सर, जेसीबी, रोड रोलर आणि इतर वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते रात्री 10 या कालावधीत प्रवेश बंद राहील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.