Pune: प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ‘पी.म.पी.एम.एल’ सेवा निवृत्त सेवकांचे उपोषण तूर्त मागे 

एमपीसी न्यूज – प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ‘पी.म.पी.एम.एल’ सेवा निवृत्त(Pune) सेवकांचे उपोषण तूर्त मागे घेण्यात आले. 
 ‘पीएमपीएमएल’ सेवा निवृत्त सेवकांना (2014 च्या शासन मान्य धोरणा नुसार), सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणे बाबत सेवा निवृत्त सेवकांनी पुणे मनपा इमारती बाहेर “साखळी उपोषण आंदोलन” सुरू केले होते. त्याचा आज 13 वा दिवस होता.
या फरकाच्या रकमे बाबते ‘पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा’ने द्यावयाची तुटीची (Pune)रक्कम ही विशिष्ट हप्त्यात निवृत्त सेवकांना देणे बाबत पीएमपीएमएल संचालक मंडळाने ठराव देखील केलेला आहे. त्यावर संचालक म्हणून आयुक्तांच्या स्वाक्षरी देखील आहे. तर असे असतांना सेवकांना या रक्कम देण्यास पीमपीएमएल संस्था का कुचराई करत असल्याची(?) विचारणा कामगार संघटनेने केल्यावर ‘वाहतूक संस्थेने’ मनपा कडून रक्कम मिळत नसल्याचे सांगितले.
त्याकरिता पुणे मनपाने शासन निर्देशित धोरणा प्रमाणे सदरची रक्कम (आवश्यक त्या हप्त्याने देखील) वाहतूक संस्थेस दिल्यास, निवृत्त सेवकांना ती वाहतूक संस्थेकडून मिळू शकेल व किमान उतार वयात त्याचा आधार होईल, या मागणी साठीच सदरचे साखळी उपोषण सुरू होते.
 या संदर्भात पीएमपीएल कामगार ‘संघटनेचे सल्लागार’ गोपाळ तिवारी यांचे प्रयत्न व शिष्टाईमुळे पुणे मनपाचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन, या तुटीच्या रकमे बाबत चर्चा केली. तसेच पूर्वीचे आयुक्त  विक्रम कुमार व व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय कोलते यांची याच विषयावर पूर्व नियोजित बैठक सोमवारी (दि १८ मार्च रोजी) ठरली होती असल्याचे निदर्शनास आणले.
परंतु, अचानक बदली झाल्यामुळे हा विषय तांत्रिक दृष्ट्या अपूर्ण राहिला असल्याचे देखील  गोपाळ तिवारी यांनी नजरेस आणले.
 त्यावर संबंधित शासकीय धोरणाची खातरजमा करून पुणे मनपाने पीएमपीएल संस्थेस तुटीचीदेणे रक्कम द्यावी. त्यानंतर वाहतूक संस्थेने सकारात्मक व नियमोचीत निर्णय करावा. आपण मान्य शासकीय धोरणा प्रमाणे निवृत्त सेवकांना फरक रक्कम देणे बाबत आश्वस्त करावे.
जेणे करून निवृत्त सेवकांना त्यांच्या न्याय्य मागणी साठी उपोषण करावे लागू नये. या वास्तव मागणीवर आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक यांची चर्चा होऊन तसे लेखी पत्र उपोषणकर्ते कामगार संघटनेचे हरी महाले, राजेंद्र ओतारी, अशोक बालवे या उपोषण कर्त्यांना देण्यात आले. यावेळी पीएमपीएल कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, सरचिटणीस नुरुद्दीन इनामदार उपस्थित होते.
 दोन्ही प्रशासकांचे आभार व्यक्त करून साखळी उपोषण समाप्त करण्यात आले. ह निर्णय निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यावर करण्यात येईल, असे ही प्रशासनाने पत्राद्वारे कळविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.