Alandi : आळंदीमध्ये संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रम व अन्नदान

एमपीसी न्यूज – आळंदीमध्ये दि.16 रोजी आज श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त माळी समाज बांधवांतर्फे श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये महापूजा, कीर्तन सेवा करण्यात  आली.

Maharashtra News : सोमवार पासून पावसाळी अधिवेशन; विविध मुद्द्यांवरून गाजणार अधिवेशन

तसेच त्यानिमित्त अन्नदानरूपी महाप्रसाद ठेवण्यात आला. यावेळेस माळी समाजातील संपूर्ण नियोजन श्री संत सावता माळी सेवा मंडळ आळंदी देवाची यांनी केले.

यावेळी संपूर्ण माळी समाज  बांधव उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात संत सावतामाळी समाधी सोहळ्या निमित्त आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.