Commissioner of Police : पोलीस आयुक्त कार्यालयात 18 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Commissioner of Police) आस्थापनेवरील 18 पोलीस अधिकारी-कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस उपनिरीक्षक बाळू दौंडकर, उपनिरीक्षक मोहन यादव, उपनिरीक्षक शिराज शेख, उपनिरीक्षक निवृत्ती चव्हाण, सहाय्यक फौजदार बाबासाहेब लांडगे, अनिल दुर्गे, दत्तात्रय कांबळे, सुभाष शिंदे, शंकर जाधव, सुदाम भेगडे, दत्तात्रय बनसोडे, नवनाथ कोकाटे, अनिल राजपूत, गणपत चव्हाण, गणपत रीटे, बापूराव खामगळ, पोलीस हवालदार राजेंद्र साळुंखे, पोलीस नाईक चंद्रकांत जाधव हे अधिकारी कर्मचारी 31 मे 2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

OBC Reservation : महापालिका प्रशासनाने काढलेल्या आरक्षण सोडतीवर 6 जूनपर्यंत नोंदविता येतील हरकती

पोलीस उपायुक्त (Commissioner of Police) काकासाहेब डोळे म्हणाले, “तुम्ही निवृत्त झाले नाहीत. समाजामध्ये व पोलीस दलासाठी तुम्ही नेहमी पोलिसच राहणार आहात. पोलीस दलात येऊन कर्तव्य बजावणे ही एक अभिमानाचीच बाब आहे. कोरोना संसर्गाच्या कठीण काळात समाजासाठी आपण दिलेले मोलाचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. पोलीस आयुक्तालयात आपले केव्हाही स्वागत आहे.”

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त सतीश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब जाधव आदींनी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.