Pune : पोलिस आयुक्तांनी दम देऊनही पुण्यातील गुंडाची सोशल मीडियावर चमकोगिरी सुरूच

एमपीसी न्यूज – पुण्यातील नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ( Pune) पदभार स्विकारताच शहरातील अगदी बड्याबड्या गुंडांची परेड काढली, त्यानंतर त्यांच्या सोशल मिडीया अकांऊटवर नजर ठेवून कारवाई करत त्यांना सज्जड दनम देखील दिला. मात्र त्यांच्या या कारवाईनंतरही गुंडैची सोशल मिडीयावरील चमकोगिरी काही संपलेली दिसत नाही.

Pimpri : पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गावर महापालिका लावणार सहा कोटींचे दिवे

पुण्यातील तब्बल 267 गुन्हेगारांची काल झडती घेण्यात आली. पुणे पोलीस आयुक्तालयात या गुन्हेगारांना उभे करून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याचे पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायचे नाहीत असे खडेबोल पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या गुन्हेगारांना सुनावले शेवटच्या सूचना आहेत, परत सूचना नाही दिल्या जाणार कारवाई होईल असा इशाराही पोलिसांनी या गुन्हेगारांना दिला आहे.

गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स व्हिडीओ गुंडांनी, गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचे नाहीत सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती.मात्र तरी सुद्धा पुणे पोलिसांच्या आदेशाला काही गुन्हेगारांच्या टोळीने केराची टोपली दाखवत रिल्स अपलोड केले होते . पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंट वर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचे समोर ( Pune) आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.