Pimpri : पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गावर महापालिका लावणार सहा कोटींचे दिवे

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असून (Pimpri) या मार्गिकेखाली महापालिका एक हजार खांबांवर सुशोभीत दिवे लावणार आहे. त्यासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली आहे.

महामेट्रोने चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल ते दापोडीच्या हरिस पुलापर्यंत मेट्रोची मार्गिका उभारली आहे. या मार्गात 322 खांब आहेत. हे काम करताना महामेट्रोने महापालिकेने दुभाजकावर लावलेले दिव्याचे खांब काढून टाकले. आता मार्गिकेखाली महापालिका दिव्यांचे खांब बसवून सुशोभिकरण करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने 7 कोटी 94 लाख 28 हजार 468 खर्चाची निविदा काढली होती. त्यात 5 ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील दोन ठेकेदार पात्र ठरले. त्यात लेक्सा लाईटींग टेक्नॉलॉजीची 25.02 टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली आहे. तो खर्च 5 कोटी 95 लाख 55 हजार 465 इतका आहे. त्या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

Pune : वेकअप पुणेकर चळवळीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करून सुशोभीकरण करण्याचा दावा महामेट्रोने केला होता. दुभाजकात हिरवळ व रोपे लावून सुशोभीकरण करणार. प्रत्येक पिलरवर व्हॅटिकल गार्डन विकसित करणार, सांडपाण्याचा पुनर्वापर करणार, असे अनेक दावे महामेट्रोने केले होते. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी महामेट्रोने केलेली नाही. मर्ज इन व मर्ज आऊटसाठी तयार केलेले नवा मार्ग पूर्ववत केलेला नाही. दर्जाहीन काम केल्याने अनेक ठिकाणी दुभाजक तुटून पडले आहेत. दुभाजकात हिरवळ न लावल्याने कचरा व राडारोडा साचला आहे. महामेट्रोच्या उदासीनतेमुळे शहराचे सौंदर्यास बाधा पोहोचत आहे.

निगडी ते दापोडी रस्त्याचे महापालिकेकडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मेट्रो मार्गिकेखालील दोन पिलरमध्ये हे सुशोभीत दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे डीएमएस प्रकाराचे आहेत. त्यामुळे विशिष्ट दिवसानुसार वेगवेगळी प्रकाश व्यवस्था करता येणार आहे. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी तिरंगा रंगाची प्रकाश व्यवस्था करता येईल. त्यामुळे हा मार्ग अधिक आकर्षक दिसणार आहे. त्यासाठी महामेट्रोची परवानगी घेण्यात आली आहे. संबंधित एजन्सी 5 वर्ष दिव्यांची देखभाल करणार आहे, असे सह शहर अभियंता संजय खाबडे यांनी (Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.