Maval : केंद्रीय सहकार विकास महामंडळ बोर्डावर नियुक्ती झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच नियुक्ती ( Maval)   करण्यात आली आहे. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही नियुक्ती केली. हर्षवर्धन पाटील यांनी सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात मोठा लौकिक मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, तळेगाव शिक्षण मंडळाचे माजी सभापती विशाल वाळुंज यांनी पाटील यांची पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी साते (मावळ) येथे भेट घेत सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Pune : पुण्यातील पोलिसांनी आयुक्तांनी दम देऊनही पुण्यातील गुंडाची सोशल मीडियावर चमकोगिरी सुरूच

देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे

मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभर पुणे सह 18 विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जात आहे.

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत सहकारी तत्वावर कृषी उत्पादने,अन्नपदार्थ,औद्योगिक वस्तू,पशुधन आणि उत्पादने यांच्या प्रक्रिया,विपणन,साठवणूक आणि निर्यात करणे तसेच रुग्णालय, आरोग्यसेवा व शिक्षणातील काही उत्पादने आणि सेवा यांचे नियोजन करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी काम केले जात आहे.तसेच देशातील विविध प्रकारच्या सहकारी संस्था, साखर उद्योग यांना सहाय्य करणे आणि त्यांच्या आर्थिक पायाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रीय विकास महामंडळ काम करीत आहे.माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे या निवडीबद्दल विविध स्तरातून स्वागत ( Maval)  होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.