Pimpri : महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय – प्रा. डॉ. सदानंद मोरे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात संस्कृती आणि समृद्धी रुजावी हेच ( Pimpri) यशवंतराव चव्हाण यांचे ध्येय होते, असे  प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी यांगितले. ते चिंचवड येथे गुरुवारी (दि.8) यशवंत – वेणू गौरव सोहळ्यात बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने यशवंत – वेणू गौरव सोहळ्यात माजी खासदार विदुरा नवले आणि त्यांच्या पत्नी निर्मला नवले या दांपत्याला प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते यशवंत – वेणू सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रशांत गोडगे – पाटील  आदी उपस्थित होते.

Maval : केंद्रीय सहकार विकास महामंडळ बोर्डावर नियुक्ती झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार

प्रा. डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, यशवंतराव आणि वेणूताई यांचे सहजीवन अतिशय उत्कट पातळीवरचे होते. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना ते वेणूताईंशी हितगुज करीत असत. राजकीय व्यक्तींनी अखंडपणे सावध राहावे असे ते मानत असत. सद्य: स्थितीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या अंगी सुसंस्कृतपणा आणि राजकीय चातुर्य होते. त्यांचा सहवास लाभल्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघोले आणि त्यांच्या पत्नी अर्चना वाघोले या दांपत्याला यशवंत – वेणू युवा – युवती सन्मान, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कोलते यांना यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार तसेच निवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे यांना सानेगुरुजी शिक्षकप्रतिभा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्या प्रित्यर्थ भाऊसाहेब भोईर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पाहुण्यांच्या हस्ते वृक्षपूजन आणि राजेंद्र वाघ यांनी सादर केलेल्या नितीन देशमुख लिखित ‘यशवंतगीता’ने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुरेश कंक यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. वर्षा बालगोपाल यांनी मानपत्राचे वाचन केले.मुकुंद आवटे, सुप्रिया सोळांकुरे, प्रभाकर वाघोले, अरुण गराडे, मुरलीधर दळवी, श्रीकांत चौगुले, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ उगले यांनी आभार ( Pimpri) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.