Talegaon : तळेगाव एमआयडीसीमधील स्विचिंग स्टेशनचे भूमिपूजन, औद्योगिकसह 1 हजार 650  ग्राहकांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसीमधील विजेची वाढती मागणी लक्षात ( Talegaon) घेऊन मिंडेवाडी येथे 22/22 केव्ही क्षमतेचे स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. 7) महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. या स्विचिंग स्टेशनमुळे तळेगाव एमआयडीसी तसेच लगतच्या पाच गावांतील सुमारे 1 हजार 650 औद्योगिक, घरगुती, वाणिज्यिक व इतर वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

त्याचे भूमिपूजन महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे, शैलेश गिते, उपअभियंता संध्या बामणीकर (एमआयडीसी), सहायक अभियंता प्रशांत पवार, विजय कांबळे, सतीश ठिगळे व संतोष सूवर्णेकर (एमआयडीसी), यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग व राहुल तिडके (एमआयडीसी), कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके व दिलीप जोगावे (एमआयडीसी)  आदींची उपस्थिती होती.

Maval : केंद्रीय सहकार विकास महामंडळ बोर्डावर नियुक्ती झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार

तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांच्या संख्येसह विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी तळेगाव एमआयडीसी फेज दोनमधील मिंडेवाडी येथे 22/22 केव्ही स्विचिंग स्टेशन उभारण्यात येत आहे.

तळेगाव एमआयडीसीच्या फेज दोन मध्ये सुमारे 150 उच्च व लघुदाबाचे औद्योगिक ग्राहक आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच जाधववाडी, बाधलवाडी, मिंडेवाडी, करंजविहिरे, नवलख उंब्रे या परिसरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सुमारे 1 हजार 500 ग्राहकांना या स्विचिंग स्टेशनमधून निघणाऱ्या आठ वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होणार आहे. येत्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करून स्विचिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे अशी सूचना यावेळी मुख्य ( Talegaon) अभियंता पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.