Lonikalbhor : लोणी येथे हातभट्टीवर कारवाई ,  91 हजार लिटर रसायन केले नष्ट

एमपीसी न्यूज –  लोणी येथे कारावाई करत हातभट्टी दारू तयार ( Lonikalbhor )  करण्याचे तब्ब्ल 91 हजार लिटर रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई आज (दि.9) सकाळी सात वाजता पुणे पोलीसांच्या गुन्हे, शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

मालक शंकर तानाजी धायगुडे ,शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

Talegaon : तळेगाव एमआयडीसीमधील स्विचिंग स्टेशनचे भूमिपूजन, औद्योगिकसह 1 हजार 650  ग्राहकांना मिळणार दर्जेदार वीजपुरवठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाला पहाटे रामदरा कॅनल रोड लोणी येथे हातभट्टी दारू तयार   करत असल्याची बातमी मिळाली. घटनास्थळी पोलिसांना कारावाई करत 7 मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये असलेले 91 हजार लिटर हातभट्टी दारू तयार रसायन मिळून आले. यावेळी पोलिसांनी तेथून 36 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई गुन्हे शाखा यूनिट 5 व 6 च्या  सामाजिक सुरक्षा विभाग तसेच  लोणीकाळभोर पोलीस यांनी केली.याचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ( Lonikalbhor )   करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.