Pimpri : पालखी प्रस्थानानंतर तब्बल आठ तासानंतर निगडी आकुर्डी सर्व्हिस रस्ता सुरु

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीने पुणे शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर तब्बल आठ तासानंतर मजणजे दुपारी दोनच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी आकुर्डी आणि निगडी येथील पुणे मुंबई महामार्गाचे रस्ते सुरु केले. वाहतूक विभागाच्या गलथान कारभारामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संताप पसरला होता.

संत तुकाराम महाराज पालखीने आज (शनिवारी) पहाटे पाच वाजता आकुर्डी मधील विठ्ठल मंदिरातून पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. सकाळी 10 वाजता पालखी फुगेवाडी पर्यंत पोहोचली. मात्र, निगडीपासून नाशिकफाट्यापर्यंत पुणे मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ग्रेड सेपरेटर आणि सर्व्हिस रस्ते रिकामे पडले होते. पालखी दूरपर्यंत गेल्यानंतर मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अपेक्षित होते.

परंतु निगडीपासून रस्ते बंद ठेवण्यात आल्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना अर्धा दिवस सुट्टी घावी लागली तर अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी घावी लागली. महामार्ग बंद केल्यामुळे वाहनचालकांना अंतर्गत रस्त्यावरून वाहतुकीची कोंडी फोडत आपल्या इच्छित स्थळी जावे लागले. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली पाहायला मिळाली.

पालखी जशी पुढे जाईल, तसे मागील रस्ते सुरू करणे गरजेचे असते. मात्र ढिसाळ नियोजनामुळे पालखी लांब अंतरापर्यंत गेली तरी देखील मागील रस्ते सुरु करण्यात आले नाहीत. पालखी पुणे हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आकुर्डी आणि निगडी येथील सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

पालखी जशी पुढे जाईल, तसे मागील रस्ते सुरू करणे गरजेचे आहे. मात्र ढिसाळ नियोजनामुळे पालखी लांब अंतरापर्यंत गेली तरी देखील अद्याप नाशिक फाट्यापासून निगडी पर्यंत रस्ते सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरून जाता येत नाही. त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले शहरातील पर्यायी रस्ते अरुंद असल्याने तसेच त्या रस्त्यांवर योग्य नियोजन नसल्याने रस्ते सकाळपासून भरले आहेत. निगडी मधील पवळे उड्डाणपुलाखाली बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ही वाहतूक भेळ चौक आणि यमुनानगरकडे वळविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.