Sangvi : जुन्या सांगवीतील गणपती मंदिरातील दानपेट्या फोडल्या

एमपीसी न्यूज – जुन्या सांगवीतील गणपती मंदिरातील दोन दानपेट्या (Sangvi ) अज्ञातांनी फोडून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली.

अतीन तुकाराम टेके (वय 42 , रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कलाविभूषण पुरस्कार जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथे असलेल्या सत्यविनायक गणपती मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मंदिरात असलेल्या दोन दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 हजारांची रोख रक्कम चोरून (Sangvi ) नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.