Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील 300 विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही लसीकरण

एमपीसी न्यूज – इंद्रायणी महाविद्यालयातील 300 विद्यार्थिनींचे मोफत (Talegaon Dabhade ) एचपीव्ही (ह्यूमन पॉपीलोमा व्हायरस) लसीकरण करण्यात आले. इंद्रायणी महाविद्यालय,मेधाविन फाउंडेशन,इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीपीए) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. इंद्रायणी महाविद्यालयात मोफत एचपीवी लसीकरण शिबीराचे आयोजन म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोग मुक्त मावळसाठी टाकलेले पहिले पाऊल असल्याचे वैशाली दाभाडे यांनी सांगितले.

 

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सीपीपीएच्या कार्यकारी संचालिका डॉ.धनंजया सरनाथ, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, मेधाविण फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, इंद्रायणी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य परेश पारेख, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ रेणुका पारवे,डॉ राणी बच्चे,डॉ दीपाली झंवर,रो प्रमोद दाभाडे,बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. गुलाब शिंदे हे उपस्थित होते.

 

 

 

Sangvi : जुन्या सांगवीतील गणपती मंदिरातील दानपेट्या फोडल्या

 

अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे यांनी सांगितले की,जागतिक स्तरावरील बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशयाशी निगडित कॅन्सरचे वाढते प्रमाण व त्यात भारतीय समाज रचनेमुळे या आजारा संदर्भातील तपासणी व उपचार यातील संकोच, यामुळे भारतात दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त महिलांना गर्भाशयाशी निगडित कॅन्सरचे निदान होते व अंदाजे सत्तर हजार महिलांचा मृत्यू होतो. यासाठी नऊ ते वीस या वयोगटातील मुलींना एच.पी.वी. लसीकरण केल्यास सदर आजारापासून पूर्ण संरक्षण मिळू शकते. तसेच सीपीपीए व मेधाविण फाउंडेशनच्या माध्यमातून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थिंनीसाठी मोफत लसीकरण उपलब्ध केल्याबद्दल वैशाली दाभाडे व डॉ. धनंजया सरनाथ यांचे विशेष आभार मानले.

 

वैशाली दाभाडे यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजाभिमुख विविध उपक्रम आयोजित करणेसाठी मेधाविण फाउंडेशन व इनरव्हील नेहमीच अग्रेसर राहिले आहे व राहील असे सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मावळ परीसरातील मुलींसाठी पुणे जिल्ह्यात प्रथमच असा आगळा वेगळा उपक्रम राबविल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.तसेच लसीचे महत्त्व पटावे व जागरूकता वाढावी म्हणून पहिली लस आपल्या मुलीला स्मार्तना प्रमोद दाभाडे हिला देत असल्याचे सांगितले.

डॉ. धनंजया सरनाथ यांनी कॅन्सर व संदर्भातील आजार तसेच विशेषतः महिलांसाठी सीपीपीएचा (Talegaon Dabhade ) सहभाग नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास तळेगाव,कान्हे व कामशेत येथील डॉक्टर,नर्स व आशासेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी इंद्रायणी महाविद्यालय व बी.फार्मसीचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ममता मराठे,आरती भोसले,मुग्धा जोर्वेकर, प्रवीण साठे, निशा पवार,जयश्री दाभाडे,डॉ लता पुणे,संगीता शेडे, नवनीता चॅटर्जी, दीपाली चव्हान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. कादंबरी घाटपांडे, प्रा. मुग्धा जोशी,प्रा. विद्या भेगडे व प्रा. दिप्ती पेठे यांनी केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. गणेश म्हस्के यांनी व आभार प्रदर्शन बी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, विश्वस्त निरूपा कानिटकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.