Ravet : गॅस चोरी प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून गॅस काढून (Ravet) त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला. तिघांना अटक करून सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) सकाळी पुनावळे येथे करण्यात आली.

किशोरकुमार भाकरराम मेधवाल (वय 22, रा. पुनावळे), रितेश सुरेश यादव (वय 21 , रा. पुनावळे), राजाराम लालाराम बिष्णोई (वय 38 , रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई तानाजी कचरे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील 300 विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही लसीकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडे गॅस रिफिलिंगचा कोणताही परवाना नसताना व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या रिकाम्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. रिफिलिंग करत असताना स्वतःच्या व लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल अशी कृती केली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत तिघांना (Ravet)अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख आठ हजार 656 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.