Sangvi : बांधकाम साइटवरून लॅपटॉप व मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवरून अज्ञात चोरट्यांनी (Sangvi) लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) मध्यरात्री एक ते सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास डीपी रोड, पिंपळे निलख येथे घडली.

Pune Crime News : सिग्नलवर थांबलेल्या तरुणीकडे पाहून फ्लाईंग किस; गजबजलेल्या कॅम्प परिसरातील घटना

पलाश हिंडेलू रॉय (वय 27, रा. डीपी रोड, पिंपळे निलख) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपी रोड पिंपळे निलख येथे सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर दरवाजा नसलेल्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, लॅपटॉप बॅग, त्यामध्ये चार्जर, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड त्याचबरोबर दोन मोबाईल फोन असा एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज (Sangvi)चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.