Pune Crime News : सिग्नलवर थांबलेल्या तरुणीकडे पाहून फ्लाईंग किस; गजबजलेल्या कॅम्प परिसरातील घटना

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील गजबजलेल्या कॅम्प परिसरात सिग्नलवर थांबलेल्या एका 29 वर्षीय तरुणीचा (Pune Crime News ) तिघांनी विनयभंग केला. फिर्यादी कडे पाहून अश्लील चाळे करत तिला फ्लाईंग किस दिला. प्रसिद्ध जॉर्ज हॉटेल समोरील सिग्नलवर हा सर्व प्रकार घडला.
जाब विचारल्यावर तिच्यासोबत वादावादी केल्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर तीन अनोळखी इसमांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune Crime News : पुढे पोलीस आहेत अंगावरील दागिने काढून ठेवा, म्हणाला अन् मंगळसूत्र घेऊन पळाला

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी ही तिच्या आईसह मोटरसायकलने जात होती. फिर्यादी यांची आई मोटरसायकल चालवत होती तर फिर्यादी या पाठीमागे बसल्या होत्या. कॅम्प परिसरातून जात असताना सिग्नल पडल्याने त्या एका ठिकाणी थांबल्या होत्या.
दरम्यान पाठीमागे एका दुचाकीवरून तीन तरुण आले. त्यांनी फिर्यादी तरुणीला डोळा मारला. सिग्नल सुटल्यानंतर फिर्यादी यांची गाडी पुढे जात असताना त्यातील एक आरोपीने फिर्यादीला पाहून फ्लाईंग किस केला. यावर फिर्यादीने आप ऐसे  क्यू करते हो ,असे म्हणाले असता त्यांनी गाडी थांबून फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.
यानंतर मात्र फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून (Pune Crime News ) अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.